#

Advertisement

Thursday, October 31, 2024, October 31, 2024 WIB
Last Updated 2024-10-31T12:12:47Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

छातीत दुखू लागल्याने प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल

Advertisement

पुणे : अचानक छातीत दुखू लागल्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना पुण्यातील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. वंचित बहुजन आघाडी यंदाची विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवत आहे. राजकारणातील प्रमुख पक्षांनी तिकीट नाकारल्यानंतर अनेक नेते वंचितकडून तिकीट मिळवून निवडणूक लढवत असल्याच दिसून आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहे. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे. पुढील 3 ते 5 दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या  निरीक्षणात राहणार आहेत. वंचित सोशल मीडिया पेजवरुन ही अधिकृत माहिती समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.