Advertisement
माढा : विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये मोठी रस्सीखेच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडून बंधू रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळवण्यासाठी लॉबिंग सुरु आहे. दुसरीकडे ऐन लोकसभा निवडणुकीत तुतारीची साथ सोडून भाजपला मदत करणारे अभिजीत पाटील यांची सत्तत्यानं शरद पवारांची भेट घेणं सुरु आहे. तसेच माढ्याच्या नगराध्यक्षा अॅड. मिनल साठे या देखील पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्याचबरोबर संजयबाबा कोकोटे हे देखील निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. मात्र, शरद पवार उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात टाकणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
माढा विधानसभेसाठी शरद पवार यांच्याकडे रणजित शिंदे यांच्यासोबत अभिजीत पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, संजय बाबा कोकाटे असे अनेक दिग्गज उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. अशातच आज अखेर रणजित शिंदे यांनी अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.