#

Advertisement

Thursday, October 24, 2024, October 24, 2024 WIB
Last Updated 2024-10-24T11:14:06Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

वडगाव शेरीमध्ये कोणाला उमेदवारी?

Advertisement

पुणे :  वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना वगळून आपल्याला उमेदवारी मिळेल, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला तसे आश्वासन दिल्याचा दावा भाजपचे माजी आमदार जगदिश मुळीक यांनी केला आहे. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीमधे निर्माण झालेला तिढा वाढतच चालला असल्याचं चित्र आहे. याठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना एबी फॉर्म दिलेला असला तरी पक्षाकडून अद्याप त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत सुनील टिंगरेंचे नाव देखील नाही. दुसरीकडे या मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल असा दावा भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी व्यक्त केला आहे.   
जगदीश मुळीक म्हणाले, वडगाव शेरीमध्ये भाजपचं संघटन चांगलं आहे, वडगाव शेरीच्या नागरिकांना आणि कार्यकर्त्यांची भावना ही आहे, तर मतदारसंघातील नागरिकांना स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार हवा आहे. त्याचबरोबर परिसरातील सर्व समस्या, भ्रष्टाचार कमी करणारा उमेदवार हवा आहे. टिंगरे यांना एबी फॉर्म देण्यात आला आहे, मात्र, उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही, त्याबाबत बोलताना जगदीश मुळीक म्हणाले, मतदारसंघात हवं त्याने तिकिट मागितलं पाहिजे, महायुतीत असलेल्या सर्व पक्षातील इच्छुक उमेदवारांपैकी कोणीही तिकीट मागितलं तरी चालेल, मात्र, पक्षश्रेष्ठींचा निर्णय याबाबत महत्त्वाचा आहे.  

सुनील टिंगरेंना अजित पवारांचा फोन 
सुनील टिंगरे यांनी म्हटले की, मला अजित पवारांनी तयारी करायला सांगितली आहे. वडगाव शेरीच्या जागेवर माझाच दावा आहे . काल रात्री मला अजित पवारांचा फोन आला होता. आज संध्याकाळपर्यंत दुसरी यादी येईल. या यादीत माझं नाव असेल, असा मला विश्वास असल्याचे टिंगरे यांनी सांगितले. वडगाव शेरी मतदारसंघातून भाजपचे नेते जगदीश मुळीकही इच्छूक आहेत. यावर बोलताना टिंगरे यांनी म्हटले की, असे अनेक जण इच्छुक असतात, ते सुद्धा तयारी करतात. मैत्रीपूर्वक लढत होऊ शकत नाही. इतर मतदारसंघांमध्ये देखील यामुळे अडचण होऊ शकते, असा गर्भित इशारा सुनील टिंगरे यांनी दिला.