#

Advertisement

Wednesday, October 30, 2024, October 30, 2024 WIB
Last Updated 2024-10-30T11:26:52Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

आठवलेंचा उमेदवार कमळ चिन्हावर लढणार

Advertisement

मुंबई :  महायुतीत भाजपने आपल्या कोट्यातून रामदास आठवलेंच्या 'रिपाइं' ला एक जागा दिली आहे. मुंबईतील कलिना मतदारसंघ आठवलेंच्या पक्षाला देण्यात आला आहे. या मतदारसंघातील आठवलेंचा उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावरच लढणार आहे. यात कलिना मतदारसंघातून आठवलेंच्या पक्षाच्या नावाने दिलेले उमेदवार अमरजितसिंह हे भाजपाचेच नेते आहेत. अमरजितसिंह हे संघाचे कट्टर समर्थक आहेत. त्यांचे संघ स्वयंसेवकांच्या गणवेषातील काही फोटोही सध्या समोर आले आहेत. त्यामुळे भाजपच्या कमळ चिन्हावर रिपाइं (RPI) चा उमेदवार असला तरी आठवले गटात मोठी अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे.
'रिपाइं'ने महायुतीला सर्वात आधी 12 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यातील धारावी, चेंबूर, केज, पुणे, जिल्ह्यातील एक जागा आणि यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडच्या अशा 5 जागांवर रिपाइं आठवले गटाचा आग्रह होता. मात्र, शेवटी दिलेल्या एका जागेवरही भाजपने आपलाच उमेदवार दिल्याने रिपाइं कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. आठवलेंच्या मवाळ भूमिकेने पक्षात वादळापुर्वीची शांतता असल्याचे बोलेले जात आहे.