Wednesday 5/03/2025
#

Advertisement

Thursday, October 24, 2024, October 24, 2024 WIB
Last Updated 2024-10-24T11:27:51Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंडेंच्या परळीत कमळ चिन्हा शिवाय निवडणूक

Advertisement

युतीमुळे धनंजय मुंडे घड्याळ चिन्हावर लढणार 

मुंबई : परळी मतदारसंघात भाजपचं वर्चस्व गेल्या 40 ते 45 वर्षांपासून अबाधित होते. स्वत: गोपीनाथ मुंडेंनी याच मतदारसंघातून आमदारकी आणि खासदारकीची निवडणूक लढली आणि जिंकली. यंदाच्या निवडणुकीत येथे कमळाचे चिन्हच निवडणुकीत असणार नाही. त्यावरुन, मनसे नेते प्रकाश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. भाजपला परळी मतदारसंघात प्रचार करण्याचा नैतिक अधिकारच उरला नसल्याचे प्रकाश महाजन यांनी म्हटले आहे.
भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या परळी विधानसभा मतदारसंघात 40 वर्षानंतर पहिल्यांदाच या विधानसभा निवडणुकीमध्ये कमळ हे चिन्ह नसणार आहे. कारण धनंजय मुंडे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढणार आहेत. महायुतीमध्ये सहयोगी पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी लढवत असल्याने भाजपाला या ठिकाणी उमेदवार नसणार आहे. त्यामुळे या विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी 40 वर्षात पहिल्यांदाच कमळाविना मतदान करावे लागणार आहे. या निवडणुकीमध्ये कमळ चिन्ह नसण्याची खंत कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यावरुन, मनेसेच्या प्रकाश महाजन यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.